Sachaa Jhutha : सच्चा झूठा चित्रपट राजेश खन्ना अफलातून डबल रोल आणि सदाबहार संगीत

Author:


अभिनेते Rajesh Khanna यांच्या कारकिर्दीतील सलग १७ सुपरहिट चित्रपटांच्या सुवर्ण साखळीतील एक मैलाचा दगड म्हणजे Sachaa Jhutha. १ मे १९७० रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश संपादन केले. दिग्दर्शक Manmohan Desai यांच्या या चित्रपटाची मूळ कथा त्यांच्या पत्नी Jeevanprabha Desai यांनी लिहिली होती. ही कथा संगीतकार Kalyanji-Anandji यांना इतकी आवडली की त्यांनी या चित्रपटासाठी निर्मात्याची व्यवस्था करून दिली. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव Dil Sachcha Chehra Jhutha असे ठेवण्याचा विचार होता, परंतु नंतर ते केवळ Sachaa Jhutha असे करण्यात आले. Dilip Kumar यांच्या Ram Aur Shyam चित्रपटाच्या कथानकाशी साधर्म्य असलेल्या या सिनेमात हुबेहूब दिसणाऱ्या सुष्ट आणि दुष्ट अशा दोन प्रवृत्तींमधील संघर्ष मोठ्या रंजकतेने मांडण्यात आला होता, जो प्रेक्षकांना कमालीचा भावला. (Sachaa Jhutha Movie)

चित्रपटाची कथा Bhola आणि Ranjeet या दोन परस्परविरोधी पात्रांभोवती फिरते. भोला (Rajesh Khanna) हा एक साधाभोळा बँड-वादक असून तो गावी आपल्या दिव्यांग बहीण Belu (Naaz) सोबत राहतो. बहिणीच्या लग्नासाठी पैशांची गरज असल्याने तो मुंबईत येतो. दुसरीकडे, मुंबई पोलीस हिऱ्यांच्या चोऱ्यांमुळे हैराण असतात आणि Inspector Pradhan (Vinod Khanna) यांना श्रीमंत हिरे व्यापारी Ranjeet Kumarवर (राजेश खन्ना) संशय असतो, परंतु पुराव्याअभावी ते हतबल असतात. रणजीतला जाळ्यात ओढण्यासाठी पोलीस Leenaची (Mumtaz) मदत घेतात. दरम्यान, मुंबईत आलेल्या भोलाला लोक चुकून रणजीत समजतात. जेव्हा खरा रणजीत भोलाला पाहतो, तेव्हा तो स्वतःला कर्करोग झाल्याचे खोटे नाटक रचतो आणि आपल्या जागी भोलाला रणजीत म्हणून वावरण्यास सांगतो. भोलाला या बदल्यात बहिणीच्या लग्नासाठी पैशांचे आश्वासन मिळते. भोला रणजीतच्या सर्व लकबी आत्मसात करतो आणि शहरात वावरू लागतो, तर खरा रणजीत मागे राहून हिऱ्यांची तस्करी करत राहतो. या दरम्यान लीना भोलालाच रणजीत समजून त्याच्या प्रेमात पडते. (Sachaa Jhutha Movie)

गावातील पुरामुळे सर्वस्व गमावलेली Belu आपल्या Moti नावाच्या कुत्र्याला घेऊन भावाच्या शोधात मुंबईत येते. तिची भेट Inspector Pradhan यांच्याशी होते आणि ते तिला आश्रय देतात. Ranjeet यांना बेलूबद्दल समजताच तो तिचा भाऊ असल्याचे नाटक करून तिला आपल्यासोबत नेतो आणि भोलाला ब्लॅकमेल करून एका मोठ्या चोरीत सामील करून घेतो. मात्र, भोला रणजीतचा कट उधळवून हिऱ्यांचा साठा घेऊन पळतो. पोलिसांच्या ट्रान्समीटरमुळे दोघेही पकडले जातात, परंतु दोघेही स्वतःला भोला घोषित केल्याने पोलीस संभ्रमात पडतात. शेवटी, त्यांचा पाळीव कुत्रा मोती खऱ्या भोलाला ओळखतो आणि रणजीतच्या पापांचा घडा भरतो. शेवटी बेलूचा विवाह इन्स्पेक्टर प्रधान यांच्याशी आणि भोलाचा विवाह लीनाशी होतो.

या चित्रपटाशी अनेक रंजक गोष्टी जोडलेल्या आहेत. Sachaa Jhutha हा १९७० मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मोठा चित्रपट ठरला. विशेष म्हणजे, सुरुवातीला हा चित्रपट Shashi Kapoor यांना ऑफर झाला होता, पण तत्कालीन काळात B-Grade चित्रपटांची नायिका मानल्या जाणाऱ्या Mumtazसोबत काम करण्यास त्यांनी नकार दिला. पुढे Rajesh Khanna यांनी ही भूमिका स्वीकारली आणि हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिला दुहेरी व नकारात्मक शेड असलेला चित्रपट ठरला. यातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना Filmfare Best Actor Award मिळाला. (Sachaa Jhutha Movie)

======================

हे देखील वाचा : सुपरस्टार राजेश खन्नाचा लेट लतीफपणा कुणी बंद केला?

======================

चित्रपटातील Meri Pyari Behaniya Banegi Dulhania हे गाणे आजही भारतातील लग्नसोहळ्यांमध्ये बँडवर हमखास वाजवले जाते. तसेच, यातील Yun Hi Tum Mujhse Baat Karti Ho या गाण्याची एक ओळ पुढे अनेक वर्षांनी संगीतकार Viju Shah यांनी Tujhe Meri Kasam चित्रपटातील गाण्यात वापरली होती. Dil Ko Dekho Chehra Na Dekho आणि Keh Do Keh Do ही गाणी मस्त जमली होती. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे हा चित्रपट आजही भारतीय सिनेमाच्या इतिहासात अजरामर आहे. Trumpet या वाद्याला या सिनेमाने खूप लोकप्रियता मिळाली.

 धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

The post Sachaa Jhutha : सच्चा झूठा चित्रपट राजेश खन्ना अफलातून डबल रोल आणि सदाबहार संगीत appeared first on Kalakruti Media.



Movie News