Saagar Moive: सागर जैसे आँखो वाली….

Author:


गोष्ट तशी साधी, सोपी. समुद्र किनारालगतच्या एका गावात राहणाऱ्या राजा (Kamal Haasan) आणि मोना डिसिल्वा (Dimple Kapadia) यांची अगदी लहानपणापासूनची झक्कास मैत्री आहे. दोघे आपल्या मित्र मैत्रिणींसोबत एकत्र लहानाचे मोठे झाले. एकमेकांना सुख दुःखात साथ दिली, आता तरुण वयातही ते गावातील एखाद्या लग्न सोहळ्यात एकत्र गातात, नाचतात, मनसोक्त मनमुराद मौज मजा करतात. O Maria गाण्यावर बेभान/ बेफाम होऊन नाचतात.(Saagar Moive)

अशातच गावालगतच्या एका बंगल्यात विदेशातून शिक्षण घेतलेला रवि (Rishi Kapoor) येतो. श्रीमंतीचा लूक त्याच्या बोलण्या/ वागण्यात दिसतोय. एका भल्या पहाटे तो समुद्र किनारी फिरायला गेला असता त्याला समुद्रात मनसोक्त मनमुरादपणे विहार करत असलेली मोना दिसते आणि तो तिचं सौंदर्य पाहून स्तब्ध होऊन जातो, अशातच तिने आपल्या ओल्या अंगाभोवती लपेटून घेतलेला टाॅवेल सटकतो आणि रविला काय बोलावं ते सुचत नाही… मोना पाहताच रवि तिच्या प्रेमात पडतो, तिच्याकडे विलक्षण आकर्षित होतो, तिला पाहून तो Chehra Hai Ya Chand Khila Hai गातो. मोनाला हळूहळू रविचे आकर्षण वाटू लागते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. Saagar Kinare Dil Yeh Pukaare(Saagar Moive)

दरम्यान, राजा आणि रवी यांच्यात चांगली मैत्री होते. आणि राजालाही मोनाबद्दल प्रेम वाटू लागते. पण आपलं तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्याचं त्यानं ठरवलं असतानाच त्याला दिसून येते (अथवा लक्षात येतं) रवि आणि मोना यांच्यात प्रेमाचं नातं गुंफले गेले आहे….राजा व्यथित होतो, Sach Mere Yaar Hai. G. P. Sippy निर्मित आणि Ramesh Sippy दिग्दर्शित Saagar हा तीन तास चार मिनिटे अवधीचा गीत संगीत नृत्याची बहारदार मेजवानी असलेल्या चित्रपटाचे हे मध्यवर्ती कथासूत्र. तुम्हालाही माहित्येय, गोष्ट चांगली असली तरी सामर्थ्य असते ते मांडणीत. Saagar ची पटकथा, संवाद आणि गीते Javed Akhtar यांची आहेत. Salim-Javed ही यशस्वी आणि लोकप्रिय अशी पटकथा आणि संवाद लेखक यांची जोडी वेगळी झाल्यावर Javed Akhtar यांनी स्वतंत्रपणे लिहिलेला पहिला चित्रपट होता, Betaab (१९८३). त्यानंतर त्यांनी Yash Chopra दिग्दर्शित Mashaal (१९८४) आणि Ramesh Talwar दिग्दर्शित Duniya (१९८४) या चित्रपटांची पटकथा आणि संवाद लिहिले. हा चित्रपट मुंबईत ९ ऑगस्ट १९८५ रोजी मुंबईत New Excelsior आणि अन्य चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. म्हणजे या चित्रपटाच्या प्रदर्शनास एकेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत.(Saagar Moive)

Saagar चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत. दिग्दर्शक Ramesh Sippy यांचा Andaz (१९७०), Seeta Aur Geeta (१९७२), Sholay (१९७५), Shaan (१९८०) आणि Shakti (१९८२) या चित्रपटानंतरचा चित्रपट. आणि यानंतरही रमेश सिप्पी यांची वाटचाल सुरू राहिली…. आपण आता एखादा प्रेमपट करावा असे रमेश सिप्पीला वाटू लागले आणि हा चित्रपट आकार घेत गेला. त्याच सुमारास Rajesh khanna आणि Dimple Kapadia यांच्या संसारात धुसफूस वाढल्याने ती वांद्रे येथील कार्टर रोडवरील राजेश खन्नाच्या आशीर्वाद बंगल्याबाहेर पडली असून जुहू चौपाटीवरील आपल्या पित्याच्या समुद्र महल बंगल्यात राहत आहे असं गाॅसिप्स मॅगझिनमधून रंगवून खूलवून वाढवून शिजवून लिहिलं जात होतं आणि ती अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे अशी ब्रेकिंग न्यूज गाजली. Raj Kapoor दिग्दर्शित Bobby (१९७३) नंतर ती संसारात रमली होती आणि आता ती रुपेरी पडद्यावर येणे ही मोठीच बातमी झाली आणि तो चित्रपट असेल हा चित्रपट असंही घडलं. गाॅसिप्स मॅगझिनमधून आणखी एक हाॅट केक न्यूज आली, Rishi Kapoor राजेश खन्नाच्या भेटीसाठी आशीर्वाद बंगल्यावर गेला आणि आपण डिंपलसोबत या चित्रपटात भूमिका करतोय याची त्याला कल्पना दिली. यावर राजेश खन्नाने त्याला सांगितले, डिंपल तिचे निर्णय ती घेते…(Saagar Moive)

Rishi Kapoor, Dimple Kapadia आणि Kamal Haasan यांच्यासह Shafi Inamdar वगैरे वगैरे अनेक कलाकार निवडले आणि ८ जून १९८२ रोजी जुहू येथील समुद्र किनारी असलेल्या एका बंगल्यात चित्रपटांचा मुहूर्त केला. चित्रीकरणाला सुरुवात करताना दोघांवर Jaane Do Na…. Paas Aane Do Na या मादक मोहक गाण्याचं चित्रीकरण सुरू केले. पहिले काही दिवस डिंपल कपाडियाकडून मोठ्या प्रमाणावर रिटेक होत गेले. तिला पुनरागमनचे दडपण आले असावे असे म्हटले गेले.(Saagar Moive)

चित्रीकरण सुरू झाले पण Javed Akhtar ची पटकथा संवाद तयार नव्हते. तोपर्यंत कला दिग्दर्शक Bijon Das Gupta यांनी मढ समुद्र किनारी अक्सा बीचवर कोळी वस्तीचा प्रचंड मोठा सेट लावला. खरं वाटावे असे गावं होते. रमेश सिप्पी परफेक्शनिस्ट. त्याचं पूर्ण समाधान होईपर्यंत रिटेक होत. चित्रपट बराच काळ निर्मितीवस्थेत राहिला. तोपर्यंत डिंपल कपाडियाने Manzil Manzil, Lava, Aitbaar, Zakhmi Sher असे चित्रपट स्वीकारले आणि ते एकेक करत प्रदर्शित होत गेले. आणि त्यात हा चित्रपट मागे पडत गेला. कमल हसन हैराण झाला. (त्यानंतर तो दहा वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर राहिला.).(Saagar Moive)

या चित्रपटाच्या गाण्याची ध्वनिमुद्रिका आणि ध्वनिफित प्रकाशित झाली आणि पहिल्याच दिवसापासून गाणी लोकप्रिय होत गेली. संगीतकार Rahul Dev Burman प्रचंड फाॅर्मात होता. Saagar Kinare Dil Yeh Pukaare या गाण्याची चाल Mamta या चित्रपटातील Rahe Na Rahe Hum (संगीतकार Roshan) या गाण्यावरुन आहे हे लक्षात येते. याच चालीवर अकरा गाणी आली आहेत. तरीही या गाण्याचा गोडवा आणि रुपेरी पडद्यावरील फ्रेश सादरीकरण कम्माल आहे. Rishi Kapoor, Dimple Kapadia आणि Kamal Haasan यांच्या बेहतरीन अभिनय आणि चित्रपटातील गाणी यासाठी हा चित्रपट कधीही कुठेही कितीही वेळा पहावा.‌ Saagar चित्रपट स्वीकारला म्हणून डिंपल कपाडियाला Balu Mahendra दिग्दर्शित Sadma (१९८३) या चित्रपटातील भूमिका स्वीकारता आली नाही.(Saagar Moive)

Javed Akhtar च्या या चित्रपटाच्या पटकथेवरुन बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली. Salim-Javed एकत्र असताना त्यांनी लिहिलेल्या Sailaab या पटकथेत काही फेरफार करून जावेद अख्तरनी ही कथा लिहिली अशी एक चर्चा होत गेली.‌ याच जोडीने Sailaab मध्ये काही फेरफार करून Gehra नावाचा चित्रपट लिहिला. राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा अशी जोडी होती. पण शत्रुघ्न सिन्हासोबत आपण काम करणार नाही असे राजेश खन्ना म्हणाला आणि तो चित्रपट बंद पडला. त्यात जावेद अख्तरने परत एकदा फेरफार केले आणि हा चित्रपट बनला. याच चित्रपटाच्या सेटवर रमेश सिप्पीने कमल हसनसाब को सेट पे बुलाव, चिंटू को भी बुलाव असं म्हटलं. हे ऋषि कपूरने अनेक वर्षे लक्षात ठेवले आणि एका इव्हेंटसमध्ये ही गोष्ट सांगताना म्हटले, या अनुभवाने मी ठरवलं की आपल्या मुलांना टोपण नाव द्यायचं नाही… (Saagar Moive)

================

हे देखील वाचा: Dev Anand: देव आनंद आणि तोही टॅक्सी ड्रायव्हर?

================

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ही घट्ट आणि सखोल नातेसंबंधांची गोष्ट, अप्रतिम देखणं असं रुपेरी पडद्यावरील सादरीकरण, छायाचित्रणकार S. M. Anwar यांचे आहे आणि संकलन M. S. Shinde यांचे आहे. दोघांचाही परफाॅर्म कम्माल. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या किती आणि कसा यशस्वी ठरला यापेक्षाही हा चित्रपट प्रेम त्रिकोणाची नयनरम्य आणि भावनिक गुंता असलेला चित्रपट आहे. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीने तो आवर्जून पहावा. Saagar Kinare Dil Yeh Pukaare….(Saagar Moive)

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

The post Saagar Moive: सागर जैसे आँखो वाली…. appeared first on Kalakruti Media.



Movie News