Hum Aapke Hain Koun..: हम आपके है कौन.. जेन झी पिढीचा कसा असेल?

Author:


जुन्या चित्रपटाची Remake म्हणा किंवा एखाद्या चित्रपटाचा पहिला, दुसरा, तिसरा असा कोणताही भाग म्हणा, हे तर होतच असते. ही न संपणारी क्रिया, प्रतिक्रिया आहे. त्यात बदलत्या काळानुसार, आजच्या Global युगातील Digital पिढीच्या सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम याबाबतच्या जी काही मते असतील, त्यानुसार, अगदी आजच्या भाषेत सांगायचे तर Gen Z आणि Gen Alpha पिढीनुसार ती Remake कशी असावी? तो पुढचा भाग कसा असावा? तो चित्रपट आजच्या Multiplex, OTT आणि Social Mediaच्या युगाचा असावा. जुनं ते सोनं नक्कीच आहे. पण बदलत्या काळाचे, आवडीनिवडीचे भानही असावे.(Hum Aapke Hain Koun..)

Rajshri Productions निर्मित आणि Sooraj R. Barjatya दिग्दर्शित सर्वकालीन सुपरहिट Hum Aapke Hain Koun..! मुंबईत ५ ऑगस्ट १९९४ रोजी प्रदर्शित झाला. संपूर्ण मुंबईत एकमेव अशा Liberty Cinema चित्रपटगृहात तो दोन मध्यंतरसह प्रदर्शित झाला. मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना याच Liberty Cinema चित्रपटगृहात दाखवल्याने Didi Tera Devar Deewana हे गाणे पडद्यावर सुरू होताच, पडद्याभोवतीची लख्ख प्रकाश योजना अनुभवायला मिळाली. या चित्रपटाचा पहिला आठवडा पूर्ण होत असतानाच त्याची लांबी थोडी कमी करून तो एका मध्यंतरचा करण्यात आला…(Hum Aapke Hain Koun..)

आजच्या Gen Z आणि Gen Alpha पिढीसाठी याच चकाचक, झगमगाटी, ग्लॅमरस, जगभरातील विविध Music Bandचे गीत, संगीत, नृत्याची बहारदार फोडणी-जोडणी असलेली बहारदार Remake कलाकृती कशी असेल? सर्वात पहिला महत्त्वाचा फंडा म्हणजे, Hum Aapke Hain Koun..! च्या Remakeचे नाव Hum Aapke Hain Koun..! हेच असेल. त्याची कथा, पटकथा, उपकथानक आजचं असेल. या चित्रपटाच्या लांबीवर कसलीही मर्यादा नाही. (Hum Aapke Hain Koun..)

Aditya Dhar दिग्दर्शित Dhurandhar पहिला आणि दुसरा यांच्या एकूण लांबीपेक्षा ही लांबी जास्त असली तरी बिघडलं कुठे? जेवढी जास्त लांबी तेवढेच या चित्रपटाच्या OTT Platformवर ती काही भागात उपलब्ध होण्याची संधी जास्त. या Remakeमधील महाखर्चिक लग्न सोहळा एखाद्या भव्य दिव्य दिमाखदार Setवर कसा असेल? १९९४ साली ते योग्य होते. २०२६ साली राजस्थानातील जयपूर, उदयपूर, जोधपूर अशा एखाद्या स्थळी असेल. संपूर्ण किल्ला विद्युत रोषणाईने उजळून निघेल. जगभरातून आलेल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना राहण्यासाठी शहरातील पंचतारांकित Hotelमध्ये राहण्याची व्यवस्था असेल. (Hum Aapke Hain Koun..)

चित्रपटाच्या लग्न सोहळा आणि त्याभोवती घडत असलेल्या गोष्टी यात मोठ्या प्रमाणावर विविध Fashionची वस्त्रे, आधुनिक महागडी सौंदर्य प्रसाधने, नवीन Modelच्या गाड्यांची रेलचेल हे सगळंच Sponsored असेल. आणि त्यात वावगं असं काहीच नाही. अगदी या लग्नातील उखाणे देखील सुरुवातीला अनेक उत्पादनांची नावे घेऊनच होतील. Sponsorना अधिकाधिक खुश ठेवण्यासाठी ही चित्रपट निर्मिती केली आहे असे कोणी म्हटलं तरी चालेल. Corporate युगातील चित्रपट असाच हवा. या चित्रपटात लग्न सोहळ्यातील एका धमाकेदार गाण्यात मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह तेलगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, भोजपुरी, गुजराती, बंगाली, आसामी, कोकणी, पंजाबी, संस्कृत, तुळू वगैरे वगैरे अनेक भाषेतील कलाकारांचे नृत्य असेल. एकाच वेळेस सात-आठ Dance Choreographer यासाठी Setवर असतील.(Hum Aapke Hain Koun..)

=============

हे देखील वाचा: Deewaar: आणखीन एक ‘दीवार’

=============

आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या चित्रपटात नायक-नायिका कोण असावेत? Kartik Aaryan आणि Sharvari Wagh ही जोडी कशी वाटते? बघा कल्पना करून. Mrunal Thakurच्या नावाचाही आपण विचार करू शकतो. आजच्या मनोरंजन क्षेत्रात कलाकारांची अजिबात कमतरता नाही. चित्रपट, मालिका, Web Series, जाहिराती या माध्यमातून अनेक लहान-मोठे कलाकार Busy आहेत. नवीन चेहरे येताहेत. Reel Starना चांगली संधी मिळतेय. आणि या Remakeमध्ये गोष्ट (Content) एक Star आहे. त्याची मांडणी, बांधणी, त्यातला VFX आणि AI तंत्रज्ञानाचा वापर यांना महत्त्व आहे….. त्याशिवाय चित्रपट पूर्ण होऊच शकत नाही.(Hum Aapke Hain Koun..)

२०२६ मध्ये Hum Aapke Hain Koun..! ची अफाट आणि अचाट Remake अशी असेल, अशीच असावी. तर आणि तरच तो आजच्या Gen Z आणि Gen Alpha पिढीचा मसालेदार मनोरंजक चित्रपट असेल. Remake म्हणजे जुना चित्रपट जसाच्या तसा पुन्हा एकदा पडद्यावर आणणं यात खरंच कल्पकता आहे का? आजच्या Global युगातील Digital पिढीला Instagramवर व्यक्त व्हायला आवडतं अशा अनेक गोष्टी पटकथेत यायला हव्यात ना?(Hum Aapke Hain Koun..)

The post Hum Aapke Hain Koun..: हम आपके है कौन.. जेन झी पिढीचा कसा असेल? appeared first on Kalakruti Media.



Movie News