Deewaar: आणखीन एक ‘दीवार’ – India’s Movie & Showbiz News Aggregator

Author:


दीवार‘ एकदा दोनदा नव्हे, तर चक्क पाच वेळा पडद्यावर आला हे माहीत आहे?

सुपर डुपर हिट‌ चित्रपटाची रिमेक (नक्कल म्हणणं योग्य दिसत नाही) येणं हे सतत सुरूच असते. चित्रपट निर्मितीतील ती एक हुकमी प्रक्रिया आहे. एका भाषेतील लोकप्रिय चित्रपट दुसऱ्या भाषेत बनवा, तोही हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यांनी एन्जॉय केला जात असेल तर आणखी एका भाषेत बनवा. अगदी विदेशी चित्रपटातील कथा कल्पना (थीम अथवा जर्म) घेऊन आपल्याकडे अनेक चित्रपट बनतच असतात. हा एका माहिती आणि मनोरंजनाची भट्टी जमेल अशा पुस्तकाचा अथवा मालिकेचा विषय. दीवार या चित्रपटाच्या रिमेकची गोष्ट अगदीच वेगळी. (Deewaar)

Gulshan Roy निर्मित आणि Yash Chopra दिग्दर्शित ‘दीवार‘ (मुंबईत प्रदर्शित २४ जानेवारी १९७५) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक माईल स्टोन चित्रपट. या चित्रपटाची वैशिष्ट्ये अनेक आणि त्यात एक महत्वाचा घटक या चित्रपटाची Salim-Javed यांची बंदिस्त पटकथा आणि प्रभावी संवाद. खुद्द याच Salim Khan आणि Javed Akhtar यांनी आपल्याच या ‘दीवार‘ ची रिमेक करावी? आपल्याच यशाच्या मोहात आपणच पडणं हे होतच असते. पण Salim Khan आणि Javed Akhtar यांनी ते का करावे? त्यांनी ते केले हे फिल्मी सत्य आहे. Salim-Javed जोडी फुटली आणि ते दोघे स्वतंत्रपणे पटकथा लेखन करू लागले. त्यांच्या त्या प्रगती पुस्तकात काय दिसते? Salim Khan लिखित या चित्रपटात ‘दीवार‘ ची मध्यवर्ती गोष्ट. पण ‘दीवार‘ ची सर कोणालाही नाही.(Deewaar)

Rajendra Kumar निर्मित आणि Mahesh Bhatt दिग्दर्शित ‘नाम‘ (१९८६) मध्ये दीवार चेच कथासूत्र. भिन्न स्वभावाचे आणि वृत्तीचे दोन भाऊ (Sanjay Dutt आणि Kumar Gaurav) आणि त्यांची करारी आई (Nutan). तर Shashilal Nair दिग्दर्शित ‘फलक‘ (१९८८) मध्येही आई (Rakhee) आणि दोन भाऊ (Jackie Shroff आणि Mohan Bhandari). एक सद्वर्तनी आणि दुसरा रस्ता भरकटलेला. मला आठवतंय, मुंबईतील आम्हा चित्रपट समीक्षकांना हा चित्रपट Metro Cinema चित्रपटगृहात मॅटीनी शोला दाखवला असता स्वतः Salim Khan हजर होते. पण तेही फार प्रभावित झाल्याचे जाणवले नाही.(Deewaar)

हे Salim Khan लिखित आणखी दोन ‘दीवार‘. यातील ‘नाम‘ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. आणि Sanjay Dutt ची कारकीर्द सावरली. Javed Akhtar यांनीही ‘दीवार‘ च डोळ्यासमोर ठेवून Rahul Rawail दिग्दर्शित ‘जीवन एक संघर्ष‘ (मुंबईत प्रदर्शित ३ ऑगस्ट १९९०) मध्येही असेच दोन भाऊ (Anil Kapoor आणि Kawaljit) आणि त्यांची करारी आई (Rakhee). हा चित्रपट फारच बेचव झाला. Anil Kapoor आणि Madhuri Dixit यांच्या प्रेमाच्या गोष्टीला अधिकाधिक वाव भाव देण्याच्या भरात दुसरा भाऊ साईड ट्रॅक झाला. ‘दीवार‘ची ताकद व्यक्तीरेखांना अधिकाधिक सुस्पष्ट करण्यात दिसली. दोन भाऊ आणि आई यांच्यातील नातेसंबंध आणि संघर्ष चढत चढत रोमहर्षक होत जातो. ते ‘दीवार‘ ची उगाच नक्कल केलेल्या एकाही चित्रपटात दिसले नाही.(Deewaar)

मुळात काळ बदलला, चित्रपट पाहण्याची माध्यमं बदलली, वाढली तरी ‘दीवार‘ अधिकाधिक परिपूर्ण चित्रपट म्हणून आपली वैशिष्ट्ये अधोरेखित करतो. खुद्द Salim Khan आणि Javed Akhtar यांना आपल्याच कसदार चित्रपटाची रिमेक लिहावीशी वाटली, त्यापेक्षा त्यांना नवीन काहीच का सुचलं नाही?(Deewaar)

Sanjay Gupta दिग्दर्शित ‘आतिश‘ (१९९४) हा ‘दीवार‘ चीच न रंगलेली रिमेक. ‘दीवार‘ ला श्रेय देतच Robin Bhatt आणि Sujit Sen यांनी पटकथा लिहिली आणि Kamlesh Pandey यांनी संवाद लेखन केले. यातील दोन भाऊ (Sanjay Dutt आणि Aditya Pancholi) आणि आई (Tanuja) यातील गोष्ट. पण उगाच काहीतरी वेगळं करायचं म्हणून मध्यंतर होण्यापूर्वी आईची हत्या होते आणि सूडनायक या हत्येचा बदला घेण्यासाठी सुडाने पेटतो. हाही चित्रपट फ्लॉप झाला. यातील एकाही चित्रपटाला ‘दीवार‘ च्या क्लायमॅक्सची उंची गाठता आलेली नाही. ‘दीवार‘च्या रिमेकची गरजच नव्हती. आणि त्याच्याशी तुलना करताना हे सगळे चित्रपट अगदीच निष्प्रभ ठरल्याने हसं होतं गेले. ‘दीवार‘ तरी ओरिजनल कुठे आहे? त्याची पाळेमुळे Mehboob Khan निर्मित आणि दिग्दर्शित ‘मदर इंडिया‘ (१९५७) या चित्रपटात आहेत.(Deewaar)

त्यातील करारी आई राधा (Nargis) अतिशय कष्टाने आपल्या दोन मुलांना लहानाची मोठं करते. त्यातील एक बिरजू (Sunil Dutt) वाह्यात बनतो आणि दुसरा रामू (Rajendra Kumar) प्रेमळ असतो. बिरजू गावात दादागिरी करतो, डाकूगिरी करू लागतो, स्त्रियांची छेडछाड करतो. त्याचं हे वागणं अतिशय त्रासदायक ठरू लागते. ते पाहून त्याची आई राधाच हाती बंदूक घेऊन त्याच्यावर गोळी झाडते आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. जवळपास सत्तर वर्षांपूर्वी एखाद्या चित्रपटाचा असा क्लायमॅक्स ही खूपच धक्कादायक गोष्ट होती.(Deewaar)

या चित्रपटाचे लेखन Mehboob Khan, Wajahat Mirza आणि S. Ali Raza यांनी केले आहे. Salim-Javed यांनी हेच कथासूत्र शहरात आणलं आणि ते सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात फिट्ट बसेल असे केले. भाषा बदलली. मांडणी बंदिस्त केली. Salim-Javed यांना हे श्रेय द्यायलाच हवे. अर्थात Yash Chopra यांचे दिग्दर्शनही प्रभावी. रिमेकची ही गोष्ट येथे संपत नाही. हीच तर चित्रपटाच्या जगाची खरी गंमत आहे. येथील प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू आहेत.(Deewaar)

================================

हे देखील वाचा : South Indian Movies : साऊथचा पिक्चर, अबब… म्हणावीत अशी गर्दीची दृश्य

================================

दिग्दर्शक Mehboob Khan यांनी आपल्याच दिग्दर्शनातील ‘औरत‘ (१९४०) या चित्रपटाची रिमेक म्हणून ‘मदर इंडिया‘ ची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. ‘औरत‘ या चित्रपटात राधा ही व्यक्तिरेखा Sardar Akhtar यांनी साकारली. Yakub यांनी बिरजू आणि Surendra यांनी रामू साकारला. या चित्रपटाचं लेखन Babubhai Mehta आणि Wajahat Mirza यांनी केले आहे.(Deewaar)

औरत‘ चित्रपटापेक्षा ‘मदर इंडिया‘ सुपर डुपर हिट‌ ठरला. देशातील खालच्या माणसापर्यंत पोहोचलेला चित्रपट अशी ‘मदर इंडिया‘ ची ख्याती आहे आणि त्यावरचा अधिकाधिक वेगळा केलेला ‘दीवार‘ हा सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटाच्या वाटचालीतील एक महत्वाचा टप्पा ठरला.त्याची रिमेक करण्याची घाई कशाला हो करायला हवी होती? तीदेखील ‘दीवार‘ चेच पटकथा आणि संवाद लेखक Salim-Javed यांनी? चित्रपट सृष्टीतील अनेक गोष्टी अनाकलनीय असतात, गरजेच्या नसतात. त्यात ही एक.(Deewaar)

त्यापेक्षा ‘दीवार‘ आजही पुन्हा एकदा पहावा. तोच भारी अनुभव.

The post Deewaar: आणखीन एक ‘दीवार’ appeared first on Kalakruti Media.



Movie News