Movie Review: मामाच्या गोव्याला जाऊया फालतूगिरी की फुल ऑन एंटरटेनमेंट?

Author:


YouTube वर गाजलेल्या ‘Struggler Saala‘ सिरीजचे तीन धम्माल पात्र यूट्यूबवरून थेट थेटरात आलेत घेऊन “Mamachya Govyala Jauya” हे नाव ऐकून डोक्यात काय येतं? ऑब्वियसली- गोवा-फन, एन्जॉयमेंट आणि फुल्ल ऑन धिंगाणा! आणि खरं सांगतो हा चित्रपट तुम्हाला तेच सरळ-सोपं, हलकं-फुलकं एंटरटेनमेंट देतो. (Movie Review)

ज्यांनी ‘स्ट्रगलर्स साला‘ ही सिरीज पाहिली आहे, त्यांना या चित्रपटाची वाईब लगेच कनेक्ट होईल. विजू माने यांचं रायटिंग-डिरेक्शन आणि संत्या, कुश्या, बाबा हे भन्नाट त्रिकुट! त्यातच सोबतीला Ankush Choudhary यांच्या अभिनयाचा तडका… हे सगळं कॉम्बिनेशन आणि गोव्याचं लोकेशन एकत्र आल्यावर चित्रपटाकडून ज्या फन आणि Entertainment ची अपेक्षा आपण करतो, ती हा सिनेमा नक्कीच पूर्ण करतो.(Movie Review)

कथेबद्दल बोलायचं तर कथा अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे! ही गोष्ट आहे एका आवली मित्रांची आणि त्यांच्या Goaच्या ट्रिपची! तीन मित्रांना गोव्याचे फ्री तिकिटे मिळतात आणि ते त्यांच्या सोबत त्यांच्या मित्राला ‘मामा’ला घेऊन गोव्याला जातात. हा पण तिथे गेल्यावर हा मामा त्यांनाच मामा बनवतो का ते अजून कोणत्या लफडयांमध्ये अडकत जातात आणि त्यातून स्वतःची कशी वाट लावून घेतात हे बघताना मज्जा येते. हा पण एवढं सिम्पलही नाहीये… साध्या कथेची ‘ट्रीटमेंट’ खूप वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे! सिनेमा एकाच रेषेत पुढे जात नाही, तर तो Chapters आणि वेगवेगळ्या पात्रांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मधून फिरतो. पहिल्या चॅप्टरमध्ये तीन मित्र आणि मामा गोव्यात गेल्यावर काय घडतं, हे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूतून दाखवलं जातं. तो चॅप्टर संपल्यावर Mahesh Manjrekar एंट्री घेतात आणि तीच कथा दुसऱ्या पात्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पुढे सरकते! पुढे Sanjay Jadhav यांची सरप्राइज एंट्री होते आणि ते एका वेगळ्याच अँगलने ही कथा पुढे नेतात आणि मग Avadhoot Gupte… असं करत सिनेमा पुढे सरकतो. या ‘मल्टी-अँगल’ आणि चॅप्टर वाईज मांडणीमुळे साधी स्टोरी असूनही सिनेमात एक वेगळाच इंटरेस्ट टिकून राहतो.(Movie Review)

अभिनयाबद्दल बोलायचं तर तर, Santosh Juvekar, Kushal Badrike आणि Abhijeet Chavan यांचं हे ‘होम ग्राऊंड‘ आहे! त्यामुळे त्यांची आपापसातील केमिस्ट्री, डायलॉग डिलिव्हरी आणि जुगलबंदी एकदम कडक जमली आहे. Ankush Choudhary यांनीही उत्तम काम केलंय आणि आणखी एक म्हणजे सिनेमात cameo आहेत जे या सिनेमाला आणखी entertaining बनवण्याचा प्रयत्न करतात. या सिनेमात ग्लॅमरचा तडका लावला आहे Neha Khan, Ruchira Jadhav, Vidula Chougule यांनी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे— जरी यात ‘Struggler Saala‘सारखी मित्रांची धिंगाण-मस्ती असली, तरी वेब सिरीजसारखी यात शिवीगाळ नाहीये. ग्लॅमरस सीन्स नक्कीच आहेत, पण कुठेही अश्लीलता किंवा आक्षेपार्ह सीन्स नाहीत.(Movie Review)

तांत्रिक बाजूने बोलायचं तर, निर्मात्यांनी चित्रपटाच्या Production Value वर चांगला पैसा खर्च केलाय हे स्पष्ट दिसतं. गोव्याचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन भारी आहे. पण, Cinematography आणि Art Design मध्ये थोडी कमी जाणवते गोव्याचे रिसॉर्ट किंवा व्हिला सीन्स टेक्निकली अजून थोडे ग्रँड आणि स्ट्रॉन्ग दाखवता आले असते. आणखी एक म्हणजे माझ्या हिशोबाने रायटींग लेवलला स्टोरी या पात्रांना घेऊन आणखी स्ट्रॉंग करता आली असती. पण विनोदी dialogues, situational comedy तुम्हाल हसवतात… (Movie Review)

==================

हे देखील वाचा : ‘रोमांचम’ उभं करणारा भूतम भयम पण तरीही…

==================

थोडक्यात सांगायचं तर, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन, डोक्याला जास्त ताण न देता फक्त हसायचं असेल आणि 2 तासात एक Goa trip मारून यायची असेल, तर ‘Mamachya Govyala Jauya’ नक्की बघा!

कलाकृती मीडिया या चित्रपटाला देत आहे 5 पैकी 3.5 स्टार्स!
जर तुम्हाला ही हलकी-फुलकी कॉमेडी अनुभवायची असेल, तर नक्की तुमच्या गँगसोबत हा सिनेमा बघायला जा.

The post Movie Review: मामाच्या गोव्याला जाऊया फालतूगिरी की फुल ऑन एंटरटेनमेंट? appeared first on Kalakruti Media.



Movie News