O. P. Nayyar: संगीताच्या सुरांना लागलेली अहंकाराची झालर

Author:


“मी या चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक आहे. माझ्या कामात Raj Khosla वारंवार ढवळाढवळ का करत आहेत?” असा संतापजनक प्रश्न जेव्हा O. P. Nayyar यांनी निर्माता Sashadhar Mukherjee यांना विचारला, तेव्हा तो केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित नव्हता, तर तो हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गजांच्या मैत्रीत पडलेल्या कायमस्वरूपी फुटीची ती नांदी होती!(O. P. Nayyar)

Raj Khosla आणि O. P. Nayyar या दोघांचाही चित्रपटसृष्टीत दबदबा होता, पण या दोघांमधील अहंकाराच्या लढाईने एका सुवर्णयुगाचा अंत केला. Raj Khosla हे केवळ एक दिग्गज दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखकच नव्हते, तर ते एक उत्तम प्रशिक्षित शास्त्रीय गायकही होते. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी All India Radio च्या संगीत विभागात नोकरी केली होती आणि त्यांची मूळ इच्छा पार्श्वगायक होण्याचीच होती. गायक बनता आले नाही तरी त्यांच्यातील सांगीतिक समज तल्लख होती, म्हणूनच त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील संगीत आजही कानसेन आवडीने ऐकतात. १९६२ साली Sashadhar Mukherjee यांच्या Ek Musafir Ek Hasina या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली. Joy Mukherjee आणि Sadhana यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या संगीताची धुरा O. P. Nayyar यांच्याकडे होती, तर दिग्दर्शन Raj Khosla करत होते. Raja Mehdi Ali Khan यांच्या लेखणीतून उतरलेली आणि Mohammed RafiAsha Bhosle यांनी गायलेली दहा गाणी या चित्रपटात होती.(O. P. Nayyar)

या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान नय्यर आणि खोसला यांच्यातील संबंध तणावपूर्ण होऊ लागले. त्या काळात O. P. Nayyar हे यशाच्या शिखरावर होते. त्यांच्या तालावर अख्खी इंडस्ट्री नाचत होती. नय्यर साहेब आपल्या अटींवर आणि स्वाभिमानी वृत्तीने काम करण्यासाठी ओळखले जात. त्यांच्या कामात कोणीही हस्तक्षेप केलेला त्यांना खपत नसे.(O. P. Nayyar)

दुसरीकडे, Raj Khosla यांना संगीताची जाण असल्याने ते अनेकदा नय्यर यांच्याकडे स्वतः तयार केलेल्या चाली घेऊन जात असत आणि नय्यर साहेब, ही चाल ऐका आणि यावर गाणे रेकॉर्ड करा, अशी विनंती करत. सुरुवातीला नय्यर यांनी याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा हा प्रकार वारंवार घडू लागला, तेव्हा नय्यर यांच्यातील स्वाभिमानी कलाकाराचा संयम सुटला. त्यांना वाटले की खोसला त्यांच्या प्रतिभेवर अविश्वास दाखवत आहेत. संतप्त नय्यर थेट निर्माता Sashadhar Mukherjee कडे गेले आणि त्यांनी चित्रपट सोडण्याची धमकी दिली. जर खोसला यांना संगीताची इतकीच ओढ आहे, तर त्यांनी दिग्दर्शन सोडून पूर्णवेळ संगीतकार का बनू नये? असा खोचक सवाल त्यांनी केला.(O. P. Nayyar)

मुखर्जींनी मध्यस्थी करून खोसला यांना संगीताच्या बाबतीत नय्यर यांच्या वाटेला न जाण्याची ताकीद दिली. हे ऐकून Raj Khosla यांचाही अहंकार दुखावला गेला. त्यांनी स्वतःला चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंपुरते मर्यादित ठेवले, पण मनातील कटुता कायम राहिली. नय्यर यांनी या अपमानाचा बदला म्हणून पुन्हा कधीही खोसला यांच्यासोबत काम न करण्याचा निश्चय केला, तर खोसला यांनीही या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून नय्यर यांच्याशी सर्व संबंध तोडले. Ek Musafir Ek Hasina हे या जोडगोळीचे शेवटचे काम ठरले. दोन महान प्रतिभावान कलाकारांच्या अहंकारापायी चित्रपटसृष्टी एका अवीट गोडीच्या संगीताला मुकली, हे मात्र वास्तव आहे.(O. P. Nayyar)

================

हे देखील वाचा: Parwana: ‘परवाना’ मधील अमिताभ बच्चन यांची पहिली नकारात्मक भूमिका!

================

या सिनेमातील गाणी भन्नाट बनली होती. Mujhe Dekhkar Aapka Muskurana (Mohammed Rafi), Phir Tere Shehar Mein (Mohammed Rafi), Humko Tumhare Ishq Ne (Mohammed Rafi), Bahut Shukriya, Badi Meherbani (Mohammed Rafi, Asha Bhosle), Aap Yun Hi Agar Humse Milte Rahe (Mohammed Rafi, Asha Bhosle राग-Kedar), Main Pyar Ka Rahi Hoon, Teri Zulf Ke Saaye Mein (Mohammed Rafi, Asha Bhosle राग-Kirwani), Tumhe Mohabbat Hai Humse Mana (Mohammed Rafi, Asha Bhosle), Zaban-e-Yaar, Man Turki, Nami Danam (Mohammed Rafi, Asha Bhosle), Udhar Woh Chal Chalte Hain (Asha Bhosle), Meri Nazrein Haseen Hain (Asha Bhosle) O. P. Nayyar यांच्या संगीतात सहसा सारंगीचा वापर विरहाच्या किंवा गंभीर गाण्यांसाठी व्हायचा.(O. P. Nayyar)

मात्र, Raj Khosla यांच्या चित्रपटामध्ये दृश्य उलगडण्याची एक विशिष्ट पद्धत (Picturization) असायची. त्यानुसार Nayyar यांनी या चित्रपटातील गाण्यांच्या इंटरल्युड्समध्ये (अंतऱ्या मधील संगीत) सारंगी, अकोर्डियन आणि Clarinet यांचा असा काही मेळ घातला की, गाण्याला एक पाश्चात्त्य आणि भारतीय संमिश्र फील मिळाला.(O. P. Nayyar)

The post O. P. Nayyar: संगीताच्या सुरांना लागलेली अहंकाराची झालर appeared first on Kalakruti Media.



Movie News